भव्यदिव्य आध्यात्मिक कार्यक्रमाची गरज कुणाची? आप्पासाहेब की शिंदे – फडणीसांची

अशी महाराष्ट्र जनतेची हाक

मुंबई l हा असा भव्य कार्यक्रम ही अप्पासाहेब धर्माधिकारी यांची अध्यात्मिक गरज नव्हती, ती शिंदे फडणवीसांची राजकीय गरज होती. पण तरीही अप्पासाहेबांनी ‘माझ्या शिष्यांना उन्हाचा त्रास नको, अमित शहांची वेळ उपलब्ध नसेल तर दुसरा पाहुणा शोधा’ असं सांगायला हरकत नव्हती.

शिंदे फडणवीस सरकारकडे लोकांसमोर जातांना दाखवावं असं एकही काम नाही, सवंग प्रसिद्धीतून सतत लोकांसमोर राहणं ही त्यांची राजकीय गरज आहे.

आजकाल राजकारण्यांना माणसं दिसतंच नाहीत, मतं दिसतात. शिंदे फडणवीसांच्या दृष्टीनं हे वीस लाख मतांचं मोठं घबाड होतं हे आधी लक्षात घेऊ, तरच तेरा कोटी रुपयांच्या चुराड्याची संगती लागू शकते. पुण्याई धर्माधिकारींची, पैसा करदात्याचा आणि वीस लाख मतं यांची असं गणित होतं.

अमित शहांची वेळ म्हणून दुपार निवडली. शिंदे-फडणवीसांची दिल्ली शरणता दर दिवशीच दिसते. मोदी शहा देव आहेत त्यांच्यासाठी. त्यांच्या देवाच्या शरणतेची शिक्षा धर्माधिकारींच्या भक्तांना भोगावी लागली.

अर्थात लोकांनी स्वतःच स्वतःचा छळ करावा का प्रश्न आहेत पण आपला एकुण लोक-विवेक पाहता असे प्रश्नच या देशात गैरलागू ठरतात.

गेलेल्या लोकांच्या प्राणाची किंमत पाच लाखाची ठरली आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सरकारचा होता का? मग विरोधी पक्ष कुठे होता? असो.