उद्धव ठाकरे की अजित पवार कोण होणार मुख्यमंत्री? शरद पवार म्हणाले..

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री पदावर दावा केला आहे. यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल असं म्हटलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री हा कोणाचा होणार याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

शरद पवार म्हणाले की, साधारणपणे तसंच असतं. ज्याचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो. यात फारसं काही चुकीचं नाही. परंतु आमची याबाबत अशी काही चर्चा झालेली नाही. ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे. जोपर्यंत महाविकास आघाडीचा याबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत हे मत मांडायला काही हरकत नाही.

दरम्यान, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा असणार आहे. हे आता जवळपास सर्वांनी मान्य केलं आहे. तितक्या वेगाने आमचा पक्ष पुढे जात आहे. त्यामुळेच मला खात्री आहे की, शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष भविष्यात राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येऊ शकतो, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.