रावेर विधानसभेत भाजपा कोणाला देणार संधी.!

रावेर (प्रतिनिधी):- पुढच वर्ष विधानसभा व लोकसभा निवडणुकांचे असल्याने रावेर विधानसभा मतदारसंघात भाजपा कडून निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहे.प्रत्येक टर्मला नवीन आमदार निवडून देणाऱ्या रावेर व यावल तालुक्यातील जनता २०२४ मध्ये नेमके कोणाला कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.स्व माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचे निधन झाल्याने भाजपाची येथे पडलेली पोकळी भरून काढण्यासाठी पक्षश्रेष्ठी डॉ कुंदन फेगडे किंवा अमोल जावळे यांच्या पैकी कोणाला आगामी निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

 

रावेर यावल विधानसभा मतदारसंघ २०१९ ला भाजपाचे सीटिंग आमदार स्व हरिभाऊ जावळे यांना पराभव करून कॉग्रेस पक्षाने येथे विजय मिळाला होता. प्रत्येक टर्मला रावेर विधानसभेतील जनता मागील ४० वर्षा पासुन नवीन उमेवदाराला येथून संधी देत आली आहे.त्यामुळे येथे भाजपाचे हॉप्स वाढले असून.रावेर विधानसभेतुन भाजपा नेमके कोणाला निवडणुकीच तिकीट देते याचे आता पासुनच कयास बांधले जात आहे.यात सर्वात पहीले नाव येते डॉ कुंदन फेगडे मागील टर्म पासून भाजपा कडून इच्छुक असुन रावेर मतदारसंघात सक्रीय आहे.आश्रय फाऊंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघात विविध उपक्रम राबवत असतात मतदारसंघात जनतेच्या थेट संपर्कात आहे. दोन्ही तालुक्यातील नागरीकांना आरोग्य संदर्भात कोणतीही समस्येसाठी डॉ कुंदन फेगडे धावून जातात तसेच पक्षामध्ये देखिल डॉ फेगडे सक्रीय आहे. मागील निवडणुकीत देखिल भाजपा पक्षश्रेष्ठीकडे रावेर विधानसभेतुन उमेदवारी मागितली परंतु त्यावेळी स्व जावळे यांना उमेदवारी मिळाली होती.परंतु पुला खालून बरेच पाणी वाहून गेले असुन यावेळी डॉ फेगडे यांचा विचार भाजपा करू शकतो.तर दूसरे नाव स्व हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांच आहे.दूसरी चर्चा अशीही आहे.भाजपा कडून अमोल जावळे यांना रावेर लोकसभेतुन संधी दिली जाऊ शकते.