सावद्यातील विमल गुटखाकिंग वर कोणाचा आशीर्वाद

भुसावळ l

येथील अनेक दिवसापासून सर्वत्र विमल गुटक्यावर कारवाई होताना दिसत असून नुकताच न्हावी तालुका यावल यासह अनेक ठिकाणी पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने विषारी विमल गुटखा विरोधी कारवाई सुरू केली असून सावद्यातील बस स्थानकासमोर एका गुटखाकिंगवर अन्नऔषध प्रशासन विभाग कधी कारवाई करणार अशी सुज्ञ नागरिकांची मागणी आहे

याबाबत सविस्तर माहिती आशी की सावदा येथील बस स्थानका समोर जाणाऱ्या एका मोठ्या शॉपवर दररोज किराणा दुकानाच्या नावावर लाखो रुपयांची विषारी विमल गुटखा विक्री सर्रास सुरू असून नुकताच न्हावी तालुका यावल येथे एका गुटखा किंग वर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने कारवाई करून एकाच अटक करण्यात आली आहे या कारवाईत सात लाखाचा मुद्देमान जप्त करण्यात आलेला सावदा येथील बस स्थानका समोर गजबळलेल्या ठिकाणी दररोज लाखो रुपयांचा अवैध विमल गुटक्याची खुलेआम विक्री होत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारा विमल गुटखा हा राज्य शासनाने महाराष्ट्रात बंदी असलेल्या या गुटक्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झालेले आहे त्यामुळे या विमल गुटख्याला राज्यात बंदी आहे परंतु सावदा हे शहर मध्यप्रदेशच्या सीमेवर असल्याने बऱ्हाणपूर येथून हा विमल गुटखा सहज वाहतूक करून उपलब्ध होतो त्यामुळे सावद्यातील बसस्थानका समोर जाणाऱ्या रस्त्यावर एका मोठ्या शॉप वर किराणा दुकानाच्या नावावर दररोज या परिसरात विमल गुटखा बिनधास्तपणे काही संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून सुरू आहे तर सर्वत्र विषारी विमल गुटक्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथक कारवाई करीत असून सावद्यातील या गुटखाकिंगवर अन्य औषध प्रशासन विभागाची जबाबदारी असताना कोणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न सुद्धा उपस्थित होत असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे