नवी दिल्ली: आज लोकसभेत खासदार ओवेसी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना प्रश्न विचारत देशात होणाऱ्या मॉब लिंचिंगवर चिंता व्यक्त केली आहे. लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कोर्टाचा निर्णय ऐकण्याची भाषा करतात, मग कोर्टाने दिलेल्या मॉब लिंचिंग विरोधात कायदा बनवण्याचे आदेश दिले असताना कायदा का नाही करत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
सुप्रीम कोर्टाने गेल्यावर्षी याविरोधात कठोर कायदा करण्याचे आदेश दिले होते. त्या मुळे अशा घटनांना आळा बसविण्यास मदत होईल असे म्हटले होते. मग सुप्रीम कोर्टाचे म्हणणे ऐकून मॉब लिंचिंग विरोधातला कायदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह का आणत नाहीत? असा प्रश्न ओवेसी यांनी उपस्थित केला आहे.