भारतात अद्याप व्हाट्सअपचा तक्रार निवारण अधिकारी का नाही?-कोर्ट

0

नवी दिल्ली-देशात दररोज व्हाट्सअप बाबत तक्रारी येत आहे. व्हाट्सअपमुळे जनभावना दुखविल्या जात असल्याची अनेक घटना उघडकीस आली आहे. मात्र अद्याप भारतात व्हाट्सअपने भारतात तक्रार निवारण अधिकारी का नेमला नाही? असा प्रश्न उपस्थित करत सर्वोच्च न्यायालायने आज आयटी विभाग आणि फायनान्स मंत्रालयाला नोटीस पाठविली आहे.

भारतात व्हाट्सअपबाबत असलेल्या तक्रार निवारणासाठी एक अधिकारी असावा याबाबत मागणी होत आहे. त्याबाबत सूचनाही करण्यात आलेल्या आहेत मात्र अद्याप तक्रार निवारण अधिकारी का नेमण्यात आलेला नाही असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला आहे.