अहमदनगर – चारित्र्यावर संशय घेत पतीने आपल्या पत्नीची डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या केली आहे. ही घटना रविवारी पहाटेच्या वेळी नगरच्या विळद परिसरातील गवळी वाडा येथे घडली आहे. प्रवीण गड्डापेन असे पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे. प्रवीण हा पुण्यात राहत होता. कौटुंबिक वादामुळे त्याची पत्नी माहेरी राहत होती. चारित्र्याच्या संशयावरून आरोपी प्रवीणने पत्नी स्वातीची (३३) हत्या केली. आरोपी प्रवीण गड्डापेन याला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या खूनाच्या घटनेमुळे विळद परिसरात एकच खळबळ उडाली आहे.