निद्रिस्त नंदुरबार नगर पालिकेला जाग येईल का ?

नंदुरबार – शहरातील मध्यवर्ती भागातील अमृत चौक रामदूत हनुमान मंदिराजवळील उघड्या ड्रेनेजमुळे अनेक नागरिकांना जायबंदी व्हावे लागले. या समस्येचे निराकरण करण्यासाठी निद्रिस्त नगर पालिकेला जाग येईल का ? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

शहरातील अमृत सिनेमा चौक भागातील रामदूत हनुमान मंदिरालगत रस्त्याच्या मध्यभागी गेल्या अनेक दिवसापासून ड्रेनेजवर् ढापे नसल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना जायबंदी व्हावे लागले. याशिवाय उघड्या ड्रेनेजमध्ये दररोज मोकाट फिरणारी गुरे, कुत्रे, बकऱ्या, पडण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहे. यासंदर्भात नगरपालिकेला वेळोवेळी लेखी व तोंडी निवेदन देण्यात आले. परंतु नगरपालिकेचे आरोग्य विभाग आणि बांधकाम विभाग एकमेकांवर जबाबदारी झटकून नागरिकांना चिलम तमाखू वो घर बाजू असा प्रकार होऊ लागला आहे.

त्याचबरोबर ठेकेदार सेवा फाउंडेशन यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना सेवा देणे ऐवजी मेवा खाण्यात ते मशगुल आहेत. तसेच या प्रभागातील नगरसेवकांना देखील समस्येकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचे सांगण्यात येत आहे.यामुळे निद्रिस्त नगरपालिकेला जाग येईल का ? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.