सध्यातरी निवृत्त होणार नाही: धोनी

0

मुंबई: भारताचा माजी क्रिकेट कप्तान महेंद्रसिंग धोनी निवृत्त होणार अशा चर्चेला उधाण आले आहे. या बद्दल धोनी याने स्पष्टीकरण देत सध्यातरी निवृत्त होणार नसल्याचा निर्वाळा दिला आहे. तसेच येणाऱ्या काळात भारतीय क्रिकेट टीमच्या योजनामध्ये माझा सहभाग नसेल असे निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांना सांगितल्याचं समजले आहे.

आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली त्यावेळी अपेक्षित असंच घडले आहे. संघात धोनीची निवड झाली नाही. वनडे, टी-२० आणि कसोटीसाठी युवा फलंदाज आणि विकेटकीपर रिषभ पंतची निवड करण्यात आली आहे.पुढील वर्षी होणाऱ्या टी २० वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. त्यामुळंच पंतला संधी दिली आहे. त्यामुळंच पंतला संधी दिली आहे. प्रसाद यांनी रविवारी धोनी आणि पंतच्या भविष्यातील प्लानवरही चर्चा केली.

कधी निवृत्त व्हायचे हे धोनीसारख्या महान खेळाडूला चांगलेच माहिती आहे. संन्यास घेणे ही त्याची वैयक्तिक बाब आहे, असं प्रसाद म्हणाले. धोनी आहे तोपर्यंत पंतला अधिकाधिक संधी देण्याचा विचार केला आहे.