राज्यपालांच्या ‘या’ भुमिकेमुळे भाजपाची गोची होणार का?

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेनशाला राज्यपालांच्या अभिभाषणाने आज सुरुवात झाली. यावेळी राज्यपालांनी कोरोना काळात ठाकरे सरकारने केलेल्या कामांचे कौतूक करत कर्नाटक महाराष्ट्र विवादाबाबत राज्य सरकार सुप्रीम कोर्टात ठाम भूमिका मांडत असून मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी काम करत असल्याचे सांगितले.

राज्यपालांनी करोना योद्ध्यांना अभिवादन करत आपल्या अभिभाषणाला सुरुवात केली. धारावीसारख्या दाटीवाटीच्या वस्तीमध्ये राज्य शासनाने प्रभावी काम केले. राज्य सरकारने करोनासंदर्भात मदतीसाठी टास्क फोर्स स्थापन केले. आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. करोना चाचणी साठी प्रयोगशाळा वाढवण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्यपालांनी यावेळी दिली. माझे कुटुंब माझी जबाबदारी हा देशातील अभिनव उपक्रम ठरला. करोनाविरोधातील लढाई सुरु असून राज्य सरकारने मी जबाबदार ही योजना सुरु केली, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

औद्योगिक मंदी असतानाही राज्य सरकारने चांगले काम केले. रोजगार मिळणे सुलभ व्हावे म्हणून महारोजगार आणि महाजॉब्ज पोर्टल सुरु केले. राज्य सरकारने आर्थिक अडचण असतानाही शेतकर्‍यांची कर्जमाफी केली, असे राज्यपालांनी सांगितले. राज्य सरकारने कोरोना प्रादुर्भाव असल्याने अंगणवाडीत न येऊ शकणार्‍या बालकांना आणि गर्भवती मातांना घरपोहोच शिदा पुरवला आहे. शाळा बंद पण शिक्षण सुरु हा उपक्रम राबवण्यात आला, असल्याचंही राज्यपालांनी सांगितले. एकीकडे राज्य सरकारच्या चुकच्या धोरणांमुळे राज्यात कोरोना वाढत असल्याचा आरोप भाजपाकडून सातत्याने करण्यात येत असतांना आता खुद्द राज्यपालांनी राज्य शासनाची पाठ थोपटल्याने भाजपाची चांगलीच गोची झाली आहे.