आमदारांच्या प्रयत्नांनी भुसावळ शहरासाठी ‘आवर्तन’

0
भुसावळ- शहरात गेल्या काही दिवसांपासून पाणीप्रश्‍न गंभीर झाला असताना हतनूर धरणातून आवर्तन सोडण्यास विलंब होत होता. शहरवासीयांची होणारी पाण्यासाठी भटकंती पाहता आमदार संजय सावकारे यांनी व्यक्तीशः जिल्हाधिकार्‍यांकडे आवर्तन सोडण्यासंदर्भात पाठपुरावा सुरू ठेवला होता. आमदारांची विनंती मान्य करीत 30 रोजी धरणातून भुसावळसाठी प्रति दिन एक हजार क्यूसेस आवर्तन सोडण्यात आले आहे.
गुरुवारी वा शुक्रवारी सायंकाळपर्यंत हे आवर्तन पालिकेच्या बंधार्‍यात पोहोचणार असून त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.
जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी 11 एप्रिल रोजी  बिगर सिंचन संस्थांनी 60 दिवसांपर्यंत साठा शिल्लक ठेवावा, असे आदेश काढत तो पर्यंत आवर्तन देण्यात येऊ नये, असे आदेश बजावले होते मात्र 40 दिवसानंतरच भुसावळला पाणी मिळवण्यात आमदार सावकारे यांना यश आले आहे.
सावकारे म्हणाले की, आपण शहरातील पाण्याचा गंभीर प्रश्‍न  मांडला तसेच पालिकेकडे स्टोअरेची मोठी व्यवस्था नसल्याची बाबही निदर्शनास आणून दिल्याने आवर्तन सोडण्यात आले. रेल्वे अधिकार्‍यांनादेखील आपण विनंती केल्यानंतर तीन क्रमांकाचे गेट उघडण्यात आले आहे.
बंधार्‍यातून पाणी लिप्टींगचा प्रयत्न असफल
गुरुवारी उत्तर भागातून पाणी लिप्ट करण्याचा प्रयोग असफल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसे झाले असतेतर शहराचा किमान आठ दिवसांचा पाणीप्रश्‍न सुटला असता.