कर्नाल: हरियाणा राज्यातील कर्नाल जिल्ह्यातील दानीयलपूर येथे आंतरजातीय विवाह करणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या आणि महिलेच्या गळ्यात चप्पलांचा हार घालून गावात मिरवणूक काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबतचे वृत्त एएनआयने दिले आहे.
गावातील सरपंच आणि नागरिकांनी आंतरजातीय विवाह केल्याने दोघांना शिक्षा म्हणून त्यांची गावातून मिरवणूक काढली आहे. त्यांना मारहाण करण्यात आल्याचेही बोलले जात आहे. महिलेचा यापूर्वी देखील लग्न झाले असून तिला मुले देखील आहे. तर ज्या मुलाशी लग्न केले आहे तो मुलगा १२ वी चे शिक्षण घेत आहे. सुरुवातीला दोघांना मारहाण करण्यात आली, त्यानंतर गावातून मिरवणूक काढण्यात आली.