आदिवासी हक्क परिषद यशस्वी करण्यासाठी जोमाने कामाला लागा – विनोद सोनवणे

भुसावळ प्रतिनिधी l

येत्या ९ जून रोजी होणारी आदिवासी हक्क परिषद यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी केले आहे.

 

या बाबत सविस्तर वृत्तांत असा की आदिवासी समुदायाला जागृत करणे

या बाबत सविस्तर वृत्तांत असा की आदिवासी समुदायाला जागृत करणे त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे या साठी वंचित बहुजन आघाडीचे पक्षाध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर हे येत्या ९ जून रोजी फैजपूर येथे येत असून ते आदिवासी समुदायात स्फुलिंग फुंकनार आहेत या साठी पक्षा तर्फे जोरदार तयारी सुरू झाली असून सदर परिषद यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आदिवासी पाड्यांवर जाऊन आदिवासी हक्क परिषदे संदर्भात प्रचार प्रसार करावा तन मन धनाने सहकार्य करावे असे आवाहन आज भुसावळ येथील शहिद अब्दुल हमिद हॉल, पंचशील नगर, भुसावळ येथे दुपारी 12:00वा बैठकीत बोलताना विनोद सोनवणे यांनी केले सदर परिषदेच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते

सदर बैठकीस जिल्हा महासचिव दिनेश इखारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे, जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग, जिल्हा संघटक राजेंद्र बारी, याकुब शेख नजीर, जिल्हा | T प्रमुख सचिन बाहे, रावेर तालुकाध्यक्ष बाळु शिरतुरे, यावल तालुकाध्यक्ष भगवान मेघे, यावल तालुका महासचिव राजेद्र गवळी, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष दिलीप पोहेकर, जामनेर तालुकाध्य सचिन सुरवाडे, भुसावळ तालुका महासचिव गणेश इंगळे,भुसावळ शहर महासचिव देवदत्त मकासरे मेजर, जामनेर तालुका संघटक अक्षय निराळे, बोदवड तालुकाध्यक्ष सुपडा निकम, सलिम शेख, जिल्हा संघटक अरुण तायडे यांची उपस्थिती होती