नवी दिल्ली-ग्लोतुर्की मधील आर्थिक संकट आणि कमजोर जागतिक बाजारातील संकेत यामुळे आज शेअर मार्केटला सुरुवात होताच सेन्सेक्स खाली आले. सेन्सेक्स १७६ अंकांनी खाली येऊन ३७ हजार ६९३ अंकावर खुलला. सोबतच निफ्टी देखील ६० अंकांनी खाली येऊन ११ हजार ३७० अंकावर सुरु झाले. एक मिनिटानंतर सेन्सेक्स खाली येण्यास सुरुवात झाले. आयटी सेक्टरच्या शेअरमध्ये विक्री होणारे सेन्सेक्स २८० अंकांनी खाली आले.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर आले खाली
हेवीवेट एचडीएफसी बँक, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, मारुती लाल निशाणीवर कामकाज करीत आहे. लार्जकॅप सोबत मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर खाली आले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा मिडकॅप इंडेक्स ०.८१ टक्के खाली आला. तर निफ्टी मिडकॅप इंडेक्स १०० इंडेक्समध्ये ०.९३ टक्क्यांनी कोसळले. बीएसईचा स्मॉलकॅप इंडेक्स ०.७४ टक्के कमी झाला.