फोर्सच्या निवृत्त कामगारांचा मेणबत्ती मोर्चा

0

पिंपरी-चिंचवड : वेतन फरक देण्याच्या मागणीसाठी आकुर्डी येथील फोर्स मोटर्स कंपनीतील निवृत्त कामगारांच्यावतीने निगडी येथील श्रीकृष्ण मंदिरापासून काळभोरनगर येथील हनुमान मंदिरापर्यत मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. त्यांंना 2004 पासूनचा वेतन करारानुसार फरक मिळालेला नाही.

आर्थिक नुकसान
याबाबत पत्रकात म्हटले आहे, की फरक न मिळाल्यामुळे आमचे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करून देखील याकडे कंपनी प्रशासन दुर्लक्ष करत आहे. कामगारांना हक्काच्या वेतन फरक देण्यापासून वंचित ठेवले जात आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठीच हा मोर्चा काढला. तरी राज्य सरकारने या प्रकरणात लक्ष घालून निवृत्त कामगारांना वेतन करारानुसार फरक देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करून कंपनीला सुचना देण्यात याव्यात. तसेच कामगारांना न्याय मिळवून द्यावा.

लक्षवेधी फलक
2004 पासून वेतर करारानुसार फरक मिळालाच पाहिजे.. फोर्स मोटर्स कंपनीतील निवृत्त कामगारांच्या वर अन्याय होत असताना सरकार, प्रशासन गप्प कसे.. अशा आशयाचे फलक घेऊन यावेळी कामगारांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.