प्रतिजैविकतेचे आरोग्यातील महत्व’ विषयावर कार्यशाळा

विद्यार्थ्यांनी जाणून घेतले इन्फेक्शन, त्यावरील उपाय कार्यशाळेला २०० विद्यार्थ्यांची उपस्थिती

जळगाव प्रतिनिधी ।

येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात “प्रतिजैविकतेचे आरोग्यातील महत्व’ या विषयावर आयोजित कार्यशाळा उत्साहात पार पडली. कार्यशाळेत २०० विद्यार्थ्यांनी सहभागी होत इन्फेक्शन आणि त्यावरील उपायासंबंधीची माहिती जाणून घेतली.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजी आणि फार्माकोलॉजी विभागातर्फे एकात्मिक अध्यापन कार्यक्रमांतर्गत प्रतिजैविकतेचे आरोग्यातील महत्व’ या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यशाळेचे उद्घाटन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन. एस. आर्विकर, मेडीसीन तज्ज्ञ डॉ. चंद्रय्या कांते यांच्या कार्यशाळेत यांनी केले सादरीकरण मायक्रोबायोलॉजी आणि फार्मोकोलॉजी विभागातर्फे एकात्मिक अध्यापन कार्यक्रमांतर्गत प्रतिजैविकतेचे आरोग्यातील महत्व’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत मधुरा कोल्हे, चाहल मानकर, रूतिका झाडबुके, श्रुती तडस, खुशी सुराणा, वाजिहा यांनी विविध विषयांवर सादरीकरण केले.