चाहत्यांची प्रतिक्षा संपली; वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर

0

मुंबई : देशभरातील क्रिकेटच्या चाहत्यांना वर्ल्ड कपच्या टीममध्ये कोणाला स्थान मिळणार याची उत्सुकता होती. अखेर ती घोषणा आज झाली. इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ आज जाहीर करण्यात आला. बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी आणि निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी हा संघ जाहीर केला. १५ सदस्यीय संघाचे नेतृत्व विराट कोहली करणार असून महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा ही अनुभवी जोडी त्याच्या मदतीला असणार आहेत.

भारतीय संघाने १९८३ आणि २०११ मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकला होता. २००७ मध्ये भारताने ट्वेंटी-20 वर्ल्ड कपही नावावर केला आहे. विशेष म्हणजे २०११ च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सात खेळाडू २०१९ च्या स्पर्धेतही खेळणार आहेत.

शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा यांना स्थान देण्यात आले आहे.