रायबरेली: नुकत्याच राजकारणात अधिकृतरित्या पदार्पण केलेल्या कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी-वाड्रा यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. महासचिवपदी नियुक्त झाल्यानंतर त्या उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. कॉंग्रेसचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी त्या प्रयत्न करत आहे. मात्र त्यांना काही ठिकाणी भाजपच्या विरोधात कमजोर उमेदवार दिल्याच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान त्यांनी याबाबत बोलतांना, प्रत्येक ठिकाणी कॉंग्रेस मोठ्या ताकतीने लढत असून भाजपला मदत होईल असे काहीही कॉंग्रेस करणार नाही. भाजपला फायदा करण्यापेक्षा मी मरण पसंत करेल अशी प्रतिक्रिया प्रियांका गांधी यांनी दिली आहे.