गुरुदासपूर: बॉलिवूड अभिनेता सनी देओलने भाजपात प्रवेश करून पंजाबमधील गुरुदासपूर मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवीत आहे. ते जोरदार प्रचार करत आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे सुनील जाखड लढत आहे. दरम्यान यावरून त्यांचे वडील अभिनेते धर्मेंद्र यांनी सनी हा सुनील जाखड यांच्या विरोधात लढणार आहे, असे माहित असते तर मी सनीला निवडणूक लढू दिली नसती असे विधान केले आहे.
सुनील जाखड हा बलराम जाखड यांचा मुलगा आहे. यावर धर्मेंद्र यांनी ‘माझे बलराम यांच्यासोबत खूप चांगले संबंध आहेत. सुनील तर मला माझ्या मुलाप्रमाणेच आहे असे सांगितले आहे.
२००४ मध्ये राजस्थान मधील चुरू मधून बलराम जाखड यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला होता. त्यानंतर धर्मेंद्र यांनी बिकानेरमधून निवडणूक लढवली आणि त्यांनी ही निवडणूक जिंकली होती. बलराम आणि त्यांच्या मैत्रीविषयी धर्मेंद्र सांगतात, मी राजकारणात आलो, त्यावेळी मला सुरुवातीला राजकारणाबद्दल काहीच कळत नव्हते. त्यावेळी बलराम यांनीच मला मागदर्शन केले होते. बलराम निवडणुकीला उभा असताना मी त्याच्यासाठी प्रचार देखील केला आहे. सुनील निवडणूक लढणार याची कल्पना आम्हाला नव्हती. पण आता काहीही बदलू शकत नाही. आमच्यावर पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच प्रचारादरम्यान लोकांना देण्यात आलेली सगळी आश्वासने आम्ही पूर्ण करणार आहोत.