मुंबई-ड्रामा क्वीन राखी सावंतने अमेरिकन रेसलरला आव्हान देत त्याच्याशी कुस्ती खेळली मात्र हे त्याला महागात पडले. अमेरिकन रेसलरने राखीला चांगलेच आपटले यामुळे तिला थेट रूग्णालयात भरती करावे लागले.
हरियाणातील पंचकुला येथे आयोजित कॉन्टिनेंटल रेसलिंग इंटरनॅशनल (सीडब्ल्यूई) बॅनरखाली रंगलेल्या रेसलिंगच्या बिग फाईटमध्येविदेशी महिला रेसलरला इतका राग आला की, तिने राखीची हवेत उचलून थेट जमिनीवर आपटले. यानंतर राखीला थेट रूग्णालयात हलवावे लागले. दरम्यान आता राखीने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती इंडियन रेसलर खलीसोबत दिसते आहे. यात त्याने हे जे सगळे तनुश्री दत्ताच्या म्हणण्यावरून झाले, असे आरोप केले आहे.
मी डान्स करूच नये, असे तनुश्रीला वाटते. त्यामुळे अमेरिकन रेसलरला पैसे देऊन तिने माझी कंबर मोडली. मी रिंगमध्ये डान्स करण्यासाठी गेली होती. पण ती रेसलर पागल झाली आणि तिने मला जमिनीवर आदळले. मी तर रेसलर नाही, असे तिने म्हटले आहे.
इंटनॅशनल बिझनेस टाईम्सशी बोलताना राखी सावंतने तनुश्रीशिवाय हनीप्रीत व गुरूमीत राम रहिमवरही आरोप केलेत. तनुश्रीसोबत हनीप्रीत व गुरमीत राम रहिम हे दोघेही माझ्यासोबत गेम खेळत आहेत, असे ती म्हणाली. एका स्थानिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीतही, राखीने तनुश्रीला लक्ष्य केले. आधी तनुश्रीने अमेरिकेत जावून माझे नाव खराब केले. आता या रेसलरने मला भारतात येऊन मारले. मी काही फाईट करायला गेले नव्हते. आता मी तनुश्रीला सोडणार नाही आणि त्या अमेरिकन रेसलरला तर मी अमेरिकेत जावून मारेल, असे राखी म्हणाली.