बंगळुरू: प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते गिरीश कर्नाड यांचे आज निधन झाले आहे. त्याच्या निधनांने चित्रपटसृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे. कर्नाड यांनी बऱ्याच कन्नड आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह राजकीय आणि सिनेक्षेत्रातील दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाड यांना श्रद्धांजली वाहताना येणाऱ्या अनेक पिढ्या गिरीश कर्नाड यांचे काम कायम स्मरणात ठेवतील असे म्हटले आहे.
गिरीश कर्नाड यांना श्रद्धांजली वाहताना राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांनी ”तुमच्या जाण्याने सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.” असे म्हटले आहे.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी ट्विटरवर लिहीले आहे की, ”व्रतस्थ रंगकर्मीला श्रध्दा पूर्वक वंदन.”
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने लिहिते, तुम्ही शिकवलेली मुल्य आणि दिलेले संस्कार कायम माझ्यासोबत राहातील.