‘यमला पगला दिवाना फिरसे’चे लूक लॉन्च

0

मुंबई- २०११ मध्ये यमला पगला दिवाना हा कॉमेडी चित्रपट आला होता. यात धर्मेंद्र त्यांचे दोन्ही पुत्र सनी देओल, बॉबी देओल यांनी धमाल केली होती. आता त्यांचाच ‘यमला पगला दिवाना फिरसे’ हा चित्रपट येत असून तो देखील धमाल कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाचे पहिले लुक लॉन्च झाले आहे. यावरूनच हा चित्रपट धमाल कॉमेडी असणार याचा अंदाज येतो. या चित्रपटाचे दिग्दर्शक नवनीत सिंह, लेखक धीरज रतन, निर्माता ब्लॅक पॅथर फिल्म आहेत. या चित्रपटात धर्मेंद्र, सनी देओल, बॉबी देओल, क्रीती खरबंदा, काजल अग्रवाल, सलमान खान, रेखा, सोनाक्षी सिन्हा, सचेत परंपरा आदींनी विविध भूमिका साकारली आहे.