पिंपरी-चिंचवड :- कामगार नेते यशवंत भोसले यांना यंदाचा खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाऊंडेशनच्या वतीने दिला जाणारा श्रमशक्ती पुरस्कार देण्यात येणार आहे. मंगळवारी सायंकाळी चार वाजता चिंचवडमधील ऑटोक्लस्टर येथे हा गौरव समारंभ होणार आहे.
हा पुरस्कार खासदार श्रीरंग बारणे व मध्य रेल पुण्याचे रेल प्रबंधक मिलिंद देऊस्कर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, नगरसेवक निलेश बारणे, अॅड. सचिन भोसले, कामगार नेते जयसिंग पोवार, माथाडी कामगार नेते मधुकर भोंडवे, नारायण मेघाजी लोखंडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नामदेव शेलार आदी उपस्थित राहणार आहे