वर्षाखेरीस काळ्या पैशांचा डेटा मिळेल-गोयल

0

नवी दिल्ली-स्विस बँकेत ठेवण्यात येणाऱ्या भारतीयांच्या पैशांमध्ये ५० टक्क्यांची वाढ होऊन ही रक्कम ७ हजार कोटी रूपयांपर्यंत गेली असल्याचा एक अहवाल समोर आल्याने मोदी सरकारच्या काळ्या पैशाविरोधातील मोहिमेला चांगलाच धक्का बसला आहे. यासंबंधी बोलताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये करार झाला असून वर्षाअखेरीस स्वित्झर्लंकडून सविस्तर डेटा मिळेल अशी माहिती दिली आहे.

‘भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या करारानुसार १ जानेवारी २०१८ पासून ते आर्थिक वर्षाच्या अखेरीसपर्यंत संपुर्ण डेटा दिला जाईल. काळा पैसा कमी झाल्याचा दावा करणाऱ्या मोदी सरकारला स्विस नॅशनल बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालामुळे धक्का बसण्याची शक्यता आहे. या एका अहवालानुसार स्विस बँकेत ठेवण्यात येणाऱ्या भारतीयांच्या पैशांमध्ये ५० टक्क्यांची वाढ होऊन ही रक्कम ७ हजार कोटी रूपयांपर्यंत गेली आहे.

भारतीयांकडून स्विस बँकेतील खात्यात थेट स्वरूपात ९९.९ कोटी स्विस फ्रँक (सुमारे ६९०० कोटी रूपये) आणि दुसऱ्या माध्यमातून जमा करण्यात आलेल्या पैशाचे प्रमाण वाढून ते १.६ कोटी स्विस फ्रँक (सुमारे ११० कोटी रूपये) इतके झाले आहे. आकडेवारीनुसार स्वित्झर्लंडच्या बँक खात्यात विदेशी ग्राहकांची एकूण संपत्ती १४६० अब्ज स्विस फ्रँकहून (सुमारे १०० लाख कोटी रूपये) अधिक झाली आहे.