बंगळुरू: कर्नाटकमधील कॉंग्रेस-जेडीएसची सत्ता जाऊन पुन्हा भाजपाची सत्ता आली आहे. आज भाजप नेते आणि कर्नाटकचे नवनियुक्त मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी अखेर विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध केले. कर्नाटक विधामसभेमध्ये आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध केले. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून कर्नाटकमध्ये सुरू असलेले राजकीय नाट्य काही काळासाठी संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
कॉंग्रेस-जेडीएसच्या काही आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे सरकार बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरली, त्यामुळे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना राजीनामा द्यावा लागला. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री होऊन देखील येडीयुरप्पा यांना बहुमत सिद्ध करता आले नव्हते. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता, आता पुन्हा तेच मुख्यमंत्री झाले आहे.