भारतातील योग गुरु आनंद गिरी महाराजांना सिडनीत अटक

0

सिडनी: भारतातील योग गुरु स्वामी आनंद गिरी महाराज यांना महिलांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली सिडनीत अटक करण्यात आली आहे. त्यांना 26 जून पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश सिडनी कोर्टाने दिले आहेत.

स्वामी आनंद गिरी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचे शिष्य आहेत. देश-विदेशात ते योग शिकवतात. महंत नरेंद्र गिरी यांनीही आनंद गिरी यांना अटक झाल्याची माहिती दिली आहे. प्रार्थनासाठी महिलांना आनंद गिरी महाराज यांनी निमंत्रण दिले होते. त्यांनी आपल्या घरात बोलवून एका २९ वर्षीय महिलेला मारहाण केली होती असा आरोप ठेवण्यात आला आहे. ते योग शिकवण्यासाठी विविध देशात जात असतात.