भुसावळ प्रतिनिधी l
येथील दादासाहेब देवीदास नामदेव भोळे महाविद्यालयातील
शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग, व अद्वैतानंद योगा व हॅप्पीनेस स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने
21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ऑनलाईन योग्, प्राणायाम, व ध्यान प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन दिनांक 12 जून 2023 रोजी सकाळी 7.30 वाजता आभासी पद्धतीने प्राचार्य डॉ. आर. पी. फालक माजी व्यवस्थापन परिषद व सिनेट सदस्य क ब चौ उ म विद्यापीठ जळगांव यांचे हस्ते करण्यात आले यावेळी योग गुरू देवेंद्र पाटील
वरीष्ठ मार्गदर्शक आर्ट् ऑफ लिव्हिंग भुसावळ प्रा. डॉ. संजय चौधरी
शा.शिक्षण व क्रीडा संचालक
सदस्य -आंतर विद्याशाखा शैक्षणिक परिषद,कबचौ उम विद्यापीठ जळगांव
प्रा.डॉ सीमा देवेंद्र योग शिक्षिका व संचालिका – अद्वैतानंद योगा व हॅप्पीनेस स्टुडिओ उपस्थित होते
प्राचार्य डॉ राजू फालक उद्घाटन पर मार्गदर्शनात सांगितले की जीवनात निरोगी राहण्यासाठी योग किती महत्वाचे आहे हे आपणास माहितीच आहे त्याच साठी दरवर्षी या शिबिराचे आयोजन केले जात आहे सर्वांनी या शिबिरात नियमित उपस्थित राहून लाभ घ्यावा व वर्षभर शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी राहावे असे आवाहन केले
योग गुरू देवेंद्र पाटील यांनी सांगितले की या योग प्रोटोकॉल प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून जीवन जगण्याचे विश्वज्ञान आंतर राष्ट्रीय पातळीवरून पोहचविण्यासाठी युनो सुद्धा प्रयत्न करीत आहे त्यासाठीच 21 जून आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून जाहीर केला आहे
सदर शिबिर दिनांक 12 जून ते 21जून 2023 दरम्यान सकाळी 7.30 ते 8.15 या वेळेत होणार आहे तरी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आयोजकांनी कळविले आहे
सदर उद्घाटन प्रसंगी प्रस्तावना प्रा डॉ संजय चौधरी सूत्र संचालन प्रा सीमा देवेंद्र यांनी केले आहे या शिबिरात 65 साधकांनी सहभाग घेतला आहे