एमआयडीसीतील कंपनीच्या छतावरून पडल्याने तरूणाचा मृत्यू

0

जळगाव : एमआयडीसी परिसरातील कंपनीच्या छतावरून खाली पडल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. रविंद्र बाळू सपकाळे (२७) मुळ रा. कठोरा (जळगाव) असे मृत तरूणाचे नाव आहे. दरम्यान पत्रामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने शॉक लागून तरूणाचा मृत्यू झाला,असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला.
मयताच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र सपकाळे हा तरूण एमआयडीसी परिसरातील पटेल पॅकीजींग कंपनीत कामाला जात होता. आज नेहमी प्रमाणे तो कामाला गेला होता.दरम्यान कंपनीच्या छतावर गेला असता खाली पडून त्यांला गंभीर दुखापत झाली. छताच्या पत्र्यामध्ये वीजेचा प्रवाह उतरल्याने शॉक लागून तो खाली कोसळला,असा आरोप नातेवाईकांनी केला. रविंद्र कोसळल्यानंतर काही कामगारांनी घटनास्थळी धाव घेत त्याला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषीत केले. घटनेची माहिती कळताच मयताच्या नातेवाईकांनी रूग्णालयात धाव घेतली.रविंद्र हा कुटुंब प्रमुख होता. त्याच्या आकस्मात निधनामुळे कुटुंबाची वाताहत झाली आहे. रविंद्र याला नऊ वर्षाचा तसेच सहा वर्षाचा मु लगा आहे. पत्नी लहान भाऊ असा त्याच्या पश्चात परिवार आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एमआयडीसीचे कर्मचारी संतोष सोनवणे यांनी रूग्णालयात धाव घेतली.