घरात घुसून अल्पवयीन मुलीसह आईवर तरुणाकडून चाकूने वार

0

संशयित ताब्यात : दोन वेळा तरुणाविरोधात पोलिसात तक्रार मात्र कारवाई नाही

जळगाव : दारुच्या नशेत थेट घरात घुसून तरूणाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. यादरम्यान तिची सुटका करण्यासाठी आईने धाव घेतल्यावर तरूणाने मुलीसह तिच्या आईवर चाकूने वार करून गंभीररित्या जखमी केल्याची खळबळजनक घटना गुरूवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शहरातील भोईटेनगर परिसरात घडली. यात 15 वर्षीय मुलगी गंभीर तर जखमी आईवर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात विनयभंगासह प्राणघातक हल्लयाचा गुन्हा दाखल झाला असून संशयित विक्की अशोक घोरपडे रा. भोईटेनगर यास ताब्यात घेतले आहे. दरम्यान तरुणाविरोधात दोन वेळा पोलिसात तक्रार देण्यात आली मात्र त्याची दखल न घेतल्याने घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

31 वर्षीय महिला अल्पवयीन मुलगी तसेच अल्पवयीन मुलासह एका भाड्याने घेतलेल्या घरात भोईटेनगर येथे वास्तव्यास आहेत. पिडीतेच्या पतीचे निधन झाले असून महिला स्वत: हातमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. पिडीतेची मुलगी तसेच मुलगा असे दोघे भावंडे इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेताहेत.

पिडीतेच्या घरातील किचनमधील चाकूने केले वार

जखमी पिडीतेच्या आई दिलेल्या माहितीनुसार, 31 रोजी रात्री विक्की घोरपडे नावाचा तरूण मद्यपान करून महिलेच्या घरात शिरला. त्यानंतर त्याने मुलीचा हात धरून तिला बेडरूममध्ये नेण्यासाठी ओढतान करत असताना त्याच्यापासून मुलीला सोडविण्याचा प्रयत्न केला विक्कीने किचन रूममधील चाकूने मुलीच्या छातीत, तर तिच्या आईच्या पोटात, मनगटावर वार केले.

भयभीत मुलाने गाठले नातेवाईकांचे घर

सह तिच्या सोडविणार्‍या आईवर वार केले. यात मुलीच्या पोटात वार करून जखमी केले. हा प्रकार पाहिल्यानंतर भयभयीत झालेला मुलगा घराबाहेर पळून नातेवाईकांचे घर गाठले. जखमी मायलेक यांनी जवळच्या नातेवाईकांना बोलविल्यानंतर दोघांना उपचारार्थ जिल्हा शासकीय रूग्णालयात हलविले. त्यानंतर पिडीत बालिकेची प्रकृती गंभीर झाल्याने तिला तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये हलविले. पिडीत मुलीवर खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे. तर पिडीतेच्या आईवर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुलीचा, आईचा रुग्णालयात नोंदविला जबाब

घटनेने भोईटनगरसह शहरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात गाठले. आई, तसेच जखमी मुलीचा पोलिसांनी जबाब नोंदविला, त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात विक्की अशोक घोरपडे या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरिक्षक जगदीश मोरे करीत आहेत.

दोन वेळा तक्रार करूनही पोलिसांचे दुर्लक्ष

यापूर्वीही दोन वेळा विक्कीने दोन ते तीन वेळा मुलीवरुन वाद घातला होता. पाच ते सहा महिन्यांपूर्वी घराजवळील रस्त्याने जात असतांना विक्कीने मला मारहाण केली, त्याबाबत शहर पोलिसात तक्रार दिली होती.अशी माहिती जखमी महिलेने बोलतांना दिली. विक्कीच्या त्रासामुळे दोन वेळा शहर पोलिसात तक्रार दिली मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही व तसेच त्याच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे विक्कीची हिंमत वाढली. तक्रारीची वेळीच दखल घेतली गेली असती तर गुरूवारी रात्री अनर्थ घडला नसता, असेही यावेळी जखमी महिलेने बोलतांना सांगितले.