तरुणाला दगडाने मारहाण

0

पिंपरी-चिंचवड : रात्रीचे जेवण झाल्यानंतर शतपावलीसाठी बाहेर गेलेल्या तरुणाला दगडाने मारहाण करण्यात आली. हा प्रकार रात्री सव्वादहाच्या सुमारास जुनी सांगवी येथे घडला. संदीप जगताप, असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. रेणुका संदीप जगताप (वय 39, रा. वेताळ महाराज सोसायटी, जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणुका यांचे पती संदीप यांना रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली करण्याची सवय आहे. दररोजप्रमाणे मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास संदीप रात्रीचे जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले. सोसायटीच्या बाहेरच्या बाजूला शतपावली करत असताना सव्वादहाच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यात दगड फेकून मारला. यामधेय संदीप गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावरून त्यांच्या पत्नी रेणुका यांनी पोलिसात फिर्याद दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.