जळगावच्या तरुणीस सव्वातीन लाखांत फसवलं

जळगाव प्रतिनिधी ।

शहरातील प्रताप नगरातील तरुणीच्या लॅपटॉप तसेच मोबाईलमधून पेटीएम आणि गुगल पे च्या खात्याची माहिती | चोरुन त्याव्दारे ३ लाख १५ हजार रुपये परस्पर काढून ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. प्रताप नगरात अनुजा श्रेयांश रायसोनी (वय २९ ) ही तरुणी राहते. तिच्याकडे असलेल्या लॅपटॉप तसेच मोबाईलमध्ये कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पेटीएम वॅलेट व गुगल पे वरुन माहिती चोरली व त्या माहितीच्या आधारे अनुजा हिच्या आयआसीआसीआय या तसेच एचडीएफसी या दोन्ही बँकेच्या खात्यावर परस्पर ऑनलाईन पध्दतीने ३लाख १५ हजार वळवले.