यूथ बॉक्सिंग चॅम्पीयनशिपमध्ये साक्षी चौधरीला सुवर्ण

0

बुडापेस्ट-बुडापेस्ट येथे सुरु असलेल्या यूथ बॉक्सिंग चॅम्पीयनशिप स्पर्धेत भारताच्या महिला खेळाडूंनी धडाकेबाज कामगिरी सुरुच ठेवली आहे. ५७ किलो वजनी गटात भारताच्या साक्षी चौधरीने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. साक्षीने क्रोएशियाच्या निकोलीना कॅसिकचा पराभव केला. शुक्रवारी याच स्पर्धेत भारताच्या नितूने सुवर्णपदकाची कमाई केली होती.

दुसरीकडे भारताच्या अनामिका आणि मनिषा या बॉक्सर्सना रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. ५१ किलो वजनी गटात अनामिकाला अमेरिकेच्या डेस्टिनी ग्रेशियाकडून अटीतटीच्या लढाईमध्ये हार पत्करावी लागली. मात्र ६४ किलो वजनी गटात इंग्लंडच्या गेमा रिचर्डसनने मनिषावर एकतर्फी मात केली. याचसोबत भारताच्या जॉनी, अस्था पहावा, भावेश कट्टीमणी, अंकित खटाना, नेहा यादव, साक्षी गायधनी या बॉक्सर्सना उपांत्य फेरीतील पराभवामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.