मुंबई : युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती जाहीर केली. युवराज हा भारताच्या 2011च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा शिल्पकार होता. त्याने 2012मध्ये अखेरची कसोटी, तर 2017मध्ये अखेरच्या मर्यादित षटकांचा सामना खेळला आहे. आयपीएलमध्येही त्याने यंदा मुंबई इंडियन्सकडून केवळ 4 सामने खेळले. त्यात त्याने एका अर्धशतकासह 98 धावा केल्या. ही घोषणा करताना युवी भावूक झाला होता. 17 वर्षांच्या कारकिर्दीत मी अनेक चढउतार पाहिले. क्रिकेटने मला सर्व काही दिलं आणि म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे, असे तो म्हणाला. दरम्यान त्याने आता बीसीसीआयकडे जगभरातील ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी मागितली
युवराजने बीसीसीआयला पत्र लिहिले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याला जगभरातील लीगमध्ये खेळण्याची परवानगी देण्यास काहीच हरकत नाही.” भारतीय क्रिकेटमध्ये सक्रिय असलेल्या खेळाडूंना परदेशी लीगमध्ये खेळण्याची बीसीसीआयकडून परवानगी नाही. त्यामुळे परदेशी लीगमध्ये खेळता यावं, यासाठी युवराजनं निवृत्ती जाहीर केली होती. त्याच्याआधी वीरेंद्र सेहवाग व झहीर खान यांनी निवृत्तीनंतर संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या टी-10 लीगमध्ये सहभाग घेतला होता. निवृत्ती जाहीर करताना युवराज म्हणाला होता की,” ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये खेळण्याची माझी इच्छा आहे. या वयात मनोरंजनासाठी मी क्रिकेट खेळू शकतो. आता मला आयुष्याचा आनंद लुटायचा आहे.”