युवराजने रोहित शर्माला मॅसेज करत दिली चांगल्या कामगिरीची ग्वाही

0

मुंबई-काल आयपीएल १२ च्या मोसमातील खेळाडूंच्या निवडीसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. यात भारताचा स्फोटक फलंदाज युवराज सिंग याला मुंबई इंडियन्स संघाने घेतले आहे. सुरुवातीच्या पहिल्या फेरीत युवराज सिंगला खरेदी करण्यात कोणत्याही संघाने रस दाखविला नाही त्यामुळे युवराज सिंगची कारकीर्द धोक्यात येण्याची भीती होती. परंतू दुसऱ्या फेरीत मुंबई इंडियन्सने मूळ किंमतीत आपल्या चमूत दाखल करून घेतले.

त्यानंतर लागलीच युवराजनेही ट्विटर करत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला” मुंबई इंडियन्सच्या कुटुंबाचा सदस्य झाल्याचा आनंद आहे. आयपीएलच्या पुढील हंगामात चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. रोहित लवकरच भेटू. असे सांगितले.

३०० पेक्षा अधिक खेळाडूंचा या लिलाव प्रक्रियेत सहभाग होता आणि त्यापैकी केवळ ७० खेळाडू नशीबवान ठरले.