जि.प. अध्यक्षांचा कार्य कालावधी पाच वर्षाचा करावा

0

राज्यातील जि.प.अध्यक्षांचे ना. उज्ज्वला पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना साकडे

जळगाव- जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ सप्टेंबर मध्ये संपत आहे. तो वाढवून मिळावा म्हणून राज्यातील सर्व जिल्हा परिषद अध्यक्षाच्या शिष्टमंडळाने नुकतेच मुंबई येथे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना जळगावच्या जिल्हा परीषद अध्यक्षा उज्वला पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिले.
जिल्ह्याच्या विकासाचा केंद्र बिंदू असल्याने ते एक मिनी मंत्रालय आहे. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाच्या विविध योजना राबविल्या जातात. त्या योजना समजून घेण्यास, त्यांची अमलबजावणी, जिल्ह्याचा अभ्यास, समस्या यांची पूर्ण जाणीव होते न होते तोच अडीच वर्षे हा कार्यकाळ संपुष्टात येतो. पदाधिकारी ज्या पदाच्या अनुषंगाने आपल्या गटाचा, गावाचा, जिल्ह्याच्या विकासाची संकल्पना घेवून येतो ती सामाजिक जाणीव तो हेतू पूर्णतः फोल ठरतो. त्यासाठी पूर्वीप्रमाणे पूर्ण पाच वर्षे कालावधी मिळावा. काही बदल्याचे अधिकार नामदार या दर्जाची बुज म्हणून अध्यक्षांना असावेत. दुष्काळी निधी ,मानधन वाढ, अध्यक्षांना शासन स्तरावरून स्वतंत्र निधी आमदारांप्रमाणे मिळावा अशा मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जळगाव जि.प. अध्यक्षा उज्वला पाटील यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सर्व जि.प. अध्यक्षाच्या शिष्टमंडळाने दिले. या मागणीसंदर्भात आशादायी निर्णय लवकरच घेतला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यानी यावेळी शिष्टमंडळाला दिले.