‘झुंड’ची शुटींग संपली; नागपूर सोडतांना बीग-बी भावूक !

0

नागपूर- सैराट, नाळ चित्रपटाच्या यशानंतर मराठमोळ्या नागराज मंजुळे यांचा आगामी चित्रपट ‘झुंड’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. झुंड चित्रपटात बॉलीवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन काम करत आहे. या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून नागपुरात शुटींग सुरु होती. दरम्यान या चित्रपटाची शुटींग पूर्ण झाली आहे. त्यामुळे नागपूरला निरोप द्यावा लागणार आहे. दरम्यान नागपूरला निरोप देतांना महानायक काहीसे भावूक झाले. त्यांनी भावनिक ट्वीट केले आहे. झुंडनंतर आता ते ब्रह्मास्त्र चित्रपट करणार आहे.

या चित्रपटाच्या शुटींग दरम्यानचे अनुभव बिग-बी यांनी सोशल मिडीयावर शेअर केले आहे. बैलगाडीच्या प्रवास, खाटेवरच्या झोपीचे काही क्षण, एसटीचा प्रवास आदी अनुभव महानायकांनी घेतले आहे.